भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाप्रमुख सुजित कुमार काटमोरे यांच्या अथक प्रयत्नातून जिल्ह्यातील शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले
आज शनिवार दिनांक 17 /8 /2024 रोजी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स भाळवणी या विद्यालयात शिक्षक भारती वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुण्या डॉ. वर्षा सुजित दुरुगकर,माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ प्राची माळवदे विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री रोकडे , ज्येष्ठ शिक्षक श्री जाधव , श्री जरे ,शिक्षक भारतीचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख श्री दडस , श्री जवंजाळ , श्री.गोंजारी सर , श्री.विधाते ,सौ.गुळवे , नागटिळक , नागणे , विधाते , भोसले उपस्थित होते.