व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्ति स्वातंत्र्य मिळाल्यामुळे स्वतःची प्रगती असे गौरव गौरव उद्गार गौरवोद्गार लायन नंदिनी जाधव यांनी केले.
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी व्यक्तीमत्व विकास शिबीर करंजकर विद्यालय तुळजापूर वेस येथे संपन्न झाले. यावेळी प्रथम लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांचे हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर लायन डॉ नारायणदास चांडक माझी प्रांतपाल, लायन नंदिनी जाधव, झोन चेअरमन, सौ राजश्री तडकासे मुख्याध्यापिका, सचिव लायन सोमशेखर भोगडे, खजिनदार लायन प्रभाकर जवळकर, माजी अध्यक्ष लायन मुकुंद जाधव, माजी अध्यक्ष लायन नागेश बुगडे, माजी अध्यक्ष लायन सागर पुकाळे, पर्यवेक्षक श्री पवार सर आदि उपस्थित होती. शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाषण केले. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
तसेच लायन नंदिनी जाधव झोन चेअरमन यांनी व्यक्तीमत्व यांवर आपले विचार मांडले. व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्ति स्वातंत्र्य मिळाल्यामुळे स्वतःची प्रगती असे गौरवोद्गार काढले.
यावेळी लायन डॉ नारायणदास चंडक यांनी लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे यांची जयंती या दोन्ही महापुरुषांचा आठवणी जाग्या केल्या. सौ राजश्री तडकासे यांनी अध्यक्षीय भाषणात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहिली. क्लबचे आणि विद्यार्थी यांचे कोतुक केले. शाळेबद्दल माहिती दिली.
शेवटी सुत्रसंचलन शाळेच्या शिक्षिका सौ श्रीदेवी यळमेली यांनी केले. आभार प्रदर्शन सचिव लायन सोमशेखर भोगडे यांनी केले.