पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून सावित्रीबाई फुले शिक्षक प्रसारक मंडळ या संस्थेला 'उत्कृष्ट संस्था' पुरस्कार प्रदान
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा प्रत्येक वर्षी वर्धापनदिनानिमित्त दिला जाणारा उत्कृष्ट संस्था पुरस्कार यावर्षी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापुर (ता. सांगोला) या संस्थेला गुरुवार दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी सोलापूर विद्यापीठाच्या सभागृह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते संस्थेचे सहसचिव मा. संजय नवले सर, मा. अशोक नवले सर यांना प्रदान करण्यात आला.
अल्पावधितच सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात सोलापूर जिल्ह्य़ातील कमलापुर (ता. सांगोला), केगाव (सोलापूर) आणि कोर्टी (ता.पंढरपूर) येथे संस्थेच्या अंतर्गत सिंहगड इन्स्टिटय़ूट उभा करून उत्कृष्ट नियोजनातून परफेक्ट शिक्षणप्रणाली राबवली आहे. देशाच्या व समाजाच्या हिताचे शिक्षण देऊन सोलापूर जिल्ह्य़ात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त "उत्कृष्ट शैक्षणिक संस्था २०२४" पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी संस्थेचे सहसचिव मा. संजय नवले सर,अशोक नवले सर,सोलापूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेजचे प्राचार्य डाॅ. शंकर नवले सर,पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर, डाॅ.एस.एच.पवार सर, डाॅ. दत्तात्रय नवले, डाॅ. साजिकराव पाटील आदीसह संस्थेतील कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या पुरस्काराने विद्यार्थी व कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.