सोलापूर प्रतिनिधी तेज पाहून
जिजाऊ ज्ञान मंदिर कोंडी येथे झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सिंहगड पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज केगाव च्या 3 मुलांनी विजय प्राप्त करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत .
यामधे 17 वर्षाखालील मुलांमध्ये प्रथमेश गायकवाड (10 वी) तसेच 17 वर्षाखालील मुलींमध्ये स्नेहा देशमुख (10 वी)आणि 14 वर्षाखालील मुलांमध्ये अभयसिंह यादव (8 वी) यांनी विजय प्राप्त केला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाले .
या सर्व यशस्वी खेळाडूंना संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय नवले यांचे प्रोत्साहन लाभले तसेच शाळेच्या प्राचार्या निखहत शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक प्रशांत जाधव, सीमा मादगुंडी व अजित कट्टे यांचे मार्गदर्शन लाभले.