भाळवणी प्रतिनिधी
सांगोला विधानसभेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील मुस्लिम समाजाच्या मागणीनुसार आमदार निधीतून शाही मशीद येथे पेव्हर ब्लॉक व सुशोभीकरणासाठी तात्काळ 7 लाख रुपये मंजूर केले. तसेच ईदगाह वॉल कंपाऊंड करणे कामासाठी 11 लाख निधी उपलब्ध करून दिला.
यावेळी उपस्थित सरपंच रणजीत जाधव, माजी उपसरपंच दाऊदभाई शेख, उद्योजक शकील काझी, युवक नेते निहाल शेख,मुन्ना इनामदार , साहिल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.