पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
दि.१५ ऑगस्ट, स्वतंत्र भारत देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन शेळवे येथील सनराईज पब्लिक स्कूल येथे अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला,कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदंबा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा,युवा उद्योजक श्री.संतोष बागल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले,तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक युवा उद्योजक श्री. धनंजय काळे उपस्थित होते,शेळवे गावचे मा. उपसरपंच तुकाराम गाजरे,विठाई जल चे विठ्ठल मारुती गाजरे, खेड भाळवणी गावचे माजी सैनिक गजेंद्र पवार, वाखरीचे उमेश पोरे,खेड भोसेचे उमेश साळुंखे,प्रगतशील बागायतदार गणपत जनार्धन गाजरे,अरविंद धर्मा लोकरे,अरुण खळगे,खेड भोसे चे अनिल जमदाडे,सिद्धनाथ पशु आहार शेळवे, व ऍग्रो स्टोअर चे मालक मोहन काका लोकरे,सनराईज ऑफसेटचे समाधानभैय्या गाजरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते,तसेच वेळात वेळ काढून शेळवे गावचे सरपंच अनिल गाजरे, उपसरपंच किरण दादा गाजरे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गाजरे, विठ्ठल सह. साखर कारखान्याचे संचालक श्री. नवनाथ नाईकनवरे ,विठ्ठल सह, साखर कारखान्याचे संचालक सिद्धेश्वर बंडगर यांचे बंधू ज्ञानेश्वर बंडगर यांनी उपस्थिती दर्शिवली, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कोणतेही कृत्रिम संगीत किंवा ध्वनिमुद्रित गीत न लावता विध्यार्थ्यांनी स्वतःच्या आवाजात आणि संगीत शिक्षकांच्या संगीत साथीने राष्ट्रगीत,ध्वजगीत सादर केले,प्रशालेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आवेशपूर्ण असे संचलन व कवायत प्रकार सादर सादर केले,तसेच आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी शाहिद झालेले देशभक्त भगतसिंग,राजगुरू,सुखदेव यांच्या त्यागाची एक हृदयस्पर्शी एकांकिका सादर केली,सदर एकांकिकेला पालकांतून खूप मोठा प्रतिसाद मिळाला,तसेच मागील वर्षभरात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली,कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील पालक परिवार,मित्रपरिवार, शिक्षणप्रेमी नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर अगदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष बागल यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रशालेच्या अंतरंगाचे, बाह्यरंगाचे तसेच गुणवत्तेचे खूप कौतुक केले,ग्रामीण भागात इतकी सर्वांगसुंदर प्रशाला उभी राहतेय,कोणतीही जाहिरात न करता, पालकांच्या संबंधातून जवळपास च्या पंधरा गावातून शेळवे येथील सनराईज प्रशाला या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणासाठी येतात,खरं तर गावासाठी आणि गावमातीतील पालकांसाठी ही अत्यंत अभिमानाची आणि कौतुकाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले,तसेच प्रशालेच्या पाठीशी तन,मन आणि धनाने खंबीरपणे उभा राहून जी लागेल ती मदत करण्याचे अभिवचन दिले, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे धनंजय काळे यांनी प्रशालेच्या स्पर्धा परीक्षेतील गुणवत्तेबाबत गौरवोद्गार काढले,प्रशालेची अगदी श्रीमंतापासून सर्वसामान्य गोरगरीब पालकांशी असलेली नाळ,आपुलकी,माफक फी आणि दर्जेदार शिक्षण या गोष्टींमुळे अगदी शिक्षक,डॉक्टर,पोलिस अधिकारी असो किंवा उच्चभ्रू कुटुंबातील व्यक्ती असो त्यांची मुलं या ठिकाणी शिकतात,ही अभिमानाची गोष्ट असल्याने प्रशालेसाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले,सनराईज ऑफसेट चे समाधान भैय्या गाजरे यांनी आपल्या मनोगतातून प्रशालेतील शिक्षकांचे मुलांवर होणारे संस्कार, अभ्यासपद्धती,संस्थापक,शिक्षक यांची विद्यार्थ्यांशी असलेली नाळ व प्रशालेकडून शिक्षणाबरोबर व्यवहारज्ञान,अनुभवासाठी म्हणून शेती-मातीशी निगडित कष्टाची कामे,उद्योग-व्यवसाय, वैज्ञानिक दृष्टिकोन,संस्कार,सर्वांगीण विकास कौशल्य,संगीत,कला,वक्तृत्व इत्यादी बाबतीत मुलांची काळजी घेतली जाते त्यावर प्रकाश टाकला जातो आणि त्यामुळे मुलं परिपूर्ण घडतात, गुणवत्तेबरोबरच प्रशालेचा परिसर हिरव्यागार पाना-फुलांनी आणि वृक्षवल्लीने बहरलेला असल्याने, ठिकाण निसर्गरम्य वाटते, कोणत्याही धोक्यापासून दूर असल्याने इथं फक्त विद्यार्थ्यांवरती शैक्षणिक सोपस्कार, संस्कार च होणार यात दुमत नसल्याचे मान्यवरांच्या वतीने बोलण्यात आले, निर्भया पथक,पोलीस अधिकारी,पंढरपूर बार असोसिएशनचे कार्यक्रम, यामुळे प्रशाला अगदी सुरक्षित असल्याचे पालकांच्या मनाला पटले आहे आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या संख्येचा आणि प्रगतीचा आलेख वरचेवर वाढतो आहे, वर्गखोल्या,बस आणि जागेअभावी प्रवेश थांबवावे लागतात हेच या प्रशालेचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले,प्रशालेचे पालटलेले स्वरूप पाहून सर्व मान्यवर,शिक्षणप्रेमी नागरिक,पालक परिवार यांनी सर्व सनराईज परिवाराचे कैतुक केले.
प्रशालेचे विध्यार्थी प्रथमेश विजय पवार यांची नुकतीच महाराष्ट्र पोलिस मध्ये निवड झाल्याने त्यांचा सन्मान करून अभिनंदन करण्यात आले, तसेच गणपत जनार्धन गाजरे यांच्या वतीने जी मुलं शिष्यवृत्ती एन.एम.एम.एस परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेली आहेत त्यांना दरवर्षी दोन हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येतात,आजही ती रक्कम यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक मोहन गायकवाड व शिक्षिका हर्षदा पन्हाळकर यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक,कर्मचारी व पालक परिवार यांनी अथक परिश्रम घेतले,शेवटी संस्थेचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली...!!