पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
राजधानीतील भारत मंडपम येथील सभागृहात, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने उच्च शैक्षणिक संस्थांची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग-2024 आज जाहीर करण्यात आली. शिक्षण, शिक्षण आणि संसाधने, शोध आणि व्यावसायिक कार्यप्रणाली, पदवी परिणाम, संपर्क आणि समावेशिता, कल्पना या मापदंडांवर एकूण 13 श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट 80 संस्थांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वर्ष 2024 पासून तीन नवीन श्रेणींचा समावेश करण्यात आला असून, यात राज्यांतील सर्वोत्कृष्ट विद्यापीठे, सर्वोत्कृष्ट मुक्त विद्यापीठे आणि कौशल्य विद्यापीठांचा समावेश करण्यात आला. यामध्ये पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ या शैक्षणिक संस्थेला तीसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचे मान प्राप्त झाला.
सर्वोत्कृष्ट समग्र संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या 11 संस्था
संस्थात्मक रँकिंगच्या यादीत समग्र संस्थांच्या श्रेणीमध्ये निवडलेल्या देशातील 100 शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 11 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे या क्रमवारीत तीस-या स्थानावर आहे तर होमी भाभा राष्ट्रीय संस्था, मुंबई (27), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे (37), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे, (42), सिम्बायोसिस इंटरनॅशनल पुणे, (52), रसायनशास्त्र तंत्रज्ञान संस्था, मुंबई (56), डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ, पुणे(63), दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एडुकेशियन अँड रीसर्च, वर्धा (71), विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (77), एस. व्ही. के. एम. ची नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई(84) तसेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई (98) क्रमांकावर आहे.
विद्यापीठ रँकिंग मध्ये राज्यातील 10 विद्यापीठे
यादीत देशातल्या 100 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील 10 विद्यापीठांचा समावेश आहे. यात क्रमांक निहाय संस्थांचा समावेश - होमी भाभा राष्ट्रीय संस्था, मुंबई (16), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे (23) सिम्बायोसिस इंटरनॅशनल पुणे (31), इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई (35), दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था, वर्धा (42), एस. व्ही. के. एम. ची नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई (49), टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई (58), मुंबई विद्यापीठ मुंबई (61) तर भारती विद्यापीठ पुणे (78) क्रमांकावर आहे.
(23) तसेच सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय, पुणे (30) वा स्थान प्राप्त केला आहे. कल्पकता (इनोव्हेशन) संस्था या श्रेणीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे या संस्थेने अव्वल क्रमांक मिळवला आहे.
दंत महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये 6 महाविद्यालय
दंत महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 40 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील सहा महाविद्यालयांचा समावेश आहे. यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे पाचव्या क्रमांकावर तर, शासकीय दंत महाविद्यालय नागपूर (15), दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था वर्धा (24), शासकीय दंत महाविद्यालय, मुंबई (25), नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज, मुंबई (28) ता भारती विद्यापीठ (मानित) दंत महाविद्यालय आणि रुग्णालय पुणे (36) स्थानावर आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्रात केंद्रीय मत्स्यपालन शिक्षण संस्था, मत्स्यपालन विद्यापीठ, मुंबई या संस्थेने नव्वा स्थान प्राप्त केला आहे. वास्तुकला आणि नियोजन या श्रेणीमध्ये विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर या संस्थेने दहावा स्थान मिळवला आहे.
राज्यातील 3 विधी महाविद्यालयांची रॅकिंग
देशातील 30 सर्वोत्कृष्ट विधी महाविद्यालयांमध्ये सिम्बायोसिस लॉ स्कूल, पुणे या संस्थेला पाचवा क्रमांक मिळाले असून, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई (31) तर महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर या संस्थेला 34 व्या क्रमांकावर आहे.
कौशल्य विद्यापीठ या श्रेणीमध्ये सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठ अव्वल शैक्षणिक वर्ष 2024 पासून तीन नवीन श्रेणींचा समावेश करण्यात आला. यात कौशल्य विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे. यात सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठ (पूर्वी सिम्बायोसिस कौशल्य आणि मुक्त विद्यापीठ पुणे) देशातील पहिली उत्कृष्ट विद्यापीठ ठरली आहे.
या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ सुकांती मुजुमदार, युजीसी अध्यक्ष प्रा. एम जगदीश कुमार, ऑल इंडिया कॉउसिंल ऑफ ट्रेनिंग अँड एजुकेशन अध्यक्ष प्रा. टी.जी. सिथाराम, शिक्षण मंत्रालयाचे सचिव के. संजय मूर्थी, सह सचिव गोविंद जयस्वाल यासह सर्व विद्यापीठांचे कुलगुरू व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.