महिलांचा आणि तरुण पिढीचा मोठ्या प्रमाणात रक्तदानास प्रतिसाद
पुळूज प्रतिनिधी दत्तात्रय पांढरे
शहीद पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांच्या जयंतीनिमित्त सुरुवातीला फोटो पूजन पुळुज गावचे लोकनियुक्त सरपंच विश्वास (भैया) विष्णुपंत महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.
आडेगाव येथील बाजीराव पेशवे सैनिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी शहीद पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांना मानवंदना दिली. धनाजी होनमाने यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. धनाजी होनमाने यांच्या जयंतीनिमित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. होते.रक्तदानासाठी सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.119 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी लोकनियुक्त सरपंच विश्वास भैया महाडिक वीर पिता तानाजी होनमाने, सालकरी नाना देव म्हमाने, पंढरपूर बाजार समिती उपसभापती राजू गावडे, रतिलाल गावडे, लक्ष्मण पांढरे,मोहन खरात, स्मारक समिती अध्यक्ष लिंगादेव निळगुंडे, उपाध्यक्ष पांडुरंग ताटे, भारत पाटील, मोहन गावडे,प्रकाश खरात, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी लोमटे, सर्जेराव होनमाने, अश्रूभान येळे, नागनाथ वाघमोडे, महेश कांबळे, विकास होनमाने,विनायक पाटील, नवनाथ खरात, दिग्विजय गावडे,प्रकाश शिंदे,अक्षय ब्लड बँक सोलापूर चेअरमन संजय कुमार शिंदे, प्रशासन अधिकारी उदय पाटील, जनसंपर्क अधिकारी अजय रुपनर इतर सर्व स्टॉप व सैनिक स्कूलचे आबासाहेब कांबळे, उपस्थित होते.दिवसभर विविध उपक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते.