सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
केगांव येथील एन.बी .नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या मृणाल मुकुंद माळी व औदुंबर म्हेत्रे या दोन विद्यार्थ्यांची सरळ सेवा भरती परीक्षेमधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा अभियांत्रिकी विभागात निवड झाली आहे.
सरळ सेवा भरती परिक्षेमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निकालामध्ये सोलापूर सिंहगड मधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थी मृणाल मुकुंद माळी व औदुंबर म्हेत्रे या दोन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र शासनाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जलसंपदा अभियांत्रिकी विभागात निवड झाली आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा तसेच जगातील नामांकित कंपनीत, शासकीय सेवेत सिंहगड कॉलेज मधील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी महाविद्यालयाकडून स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. त्यासाठी आवश्यक ती मदत महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना करण्यात येत असते.
त्यामुळे महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.सिंहगड महाविद्यालय हे विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात अग्रस्थानी आहे. विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणप्रणाली, उच्चशिक्षित व शिस्तप्रिय अनुभवी प्राध्यापक वर्ग, जगातील नामवंत कंपनीमध्ये विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या नोकऱ्या, सिंहगडचे विद्यापीठातील उत्कृष्ट निकाल, विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास व्हावा यासाठी महाविद्यालय नेहमीच विविध उपक्रम राबवत असते.अल्पावधितच विद्यार्थी व पालक यांच्या विश्वासास पात्र ठरलेले सिंहगड हे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय असून राष्ट्रीय स्तरावरील मानांकन प्राप्त असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय आहे.तसेच या सर्व गोष्टीमुळे सोलापूर सिंहगड इंजिनीअरिंग कॉलेजला नॅशनल अक्रेडिटेशन अँड अससमेंट कौन्सिल म्हणजे नॅक ' ए ' ग्रेड मिळालेले नामवंत महाविद्यालय आहे.
या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ.रवींद्र व्यवहारे व शेखर जगदे, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ.प्रदीप तपकीरे , तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मच्याऱ्यांनी अभिनंदन केले.