मुंबई प्रतिनिधी उदय वाघवणकर तेज न्यूज
शनिवार दि. २० जुलै रोजी जोगेश्वरी पूर्वेकडील शिवसेना शाखा क्र. ७७ मध्ये जय महाराष्ट्र ग्रुप आयोजित सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बंधू वेतकर, महादेव परब, अरबाज खान, रोमेश चवले, विजय पवार, आणि जेष्ठ पत्रकार संदीप कसालकर या मान्यवरांचा सन्मान विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, माजी नगरसेवक अनंत नर, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर व रविंद्र साळवी, युवती सेना विधानसभा युवती अधिकारी मानसी गोडांबे, ग्राहक कक्षाचे विधानसभा संघटक कक्ष प्रकाश भोसले, उपविभाग समन्वयक संदीप कोठारकर, शाखाप्रमुख प्रदीप गांधी, नितेश म्हात्रे, नंदकुमार ताम्हणकर, मुंबई डीजी निमंत्रक विजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे वॉर्ड क्र.७८ चे फैज अन्सारी आणि जय महाराष्ट्र ग्रुपचे प्रमुख तसेच या कार्यक्रमाचे आयोजक महेश पडवळ शाखा समन्वयक / उप कक्ष संघटक शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, अनुप भोसले / उपकक्ष संघटक, जगदीश राऊत / कक्ष वॉर्ड संघटक, रुपेश शिवणेकर / कक्ष प्रतिनिधी नुरूल शेख / उपशाखाप्रमुख, अविनाश रासम व शेखरआरोळकर /गटप्रमुख, दीपक चव्हाण मेडिकल टीम लीडर, कु.साजिल खान कु. नुपूर पवार, कु. प्रसाद मुरकर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.