पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
शिवभूमी विद्यालय यमुनानगर निगडी येथील विद्यालयात आषाढी एकादशीचे औचित्य साधून शाळेच्या आवारात सालाबाद प्रमाणे वृक्ष पूजन आणि वृक्षारोपण यांचा शुभारंभ करण्यात आला या सोहळ्याचे आयोजन माननीय मुख्याध्यापिका पाटील अश्विनी आणि शाळेतील उपक्रमशिल तंत्रशिक्षिका कवयित्री लेखिका कोठेकर योगिता यांच्या हस्ते पार पाडण्यात आला .
त्यांनी विदयार्थ्यांच्या वारकरी पोषाखातील फोटोंचे कटआऊट उभारून पंढरीच्या दिंडीचे दृश्य या सोहळ्यात उभारले होते . त्याद्वारे जनजागृतीचे बोर्ड लावून पाणी वृक्ष व पुस्तकांचे महत्व सांगण्यात यश आले विद्यार्थ्यांनी सुंदर पालख्या टाकाऊ खोक्यापासून तयार केल्या . सुंदर रित्या संतांची विठ्ठल रघुमाची चित्रे रंगवली सुशोभित केली . तसेच या प्रकल्पांतर्गत वृक्ष पूजन आणि वृक्षारोपण विद्यार्थ्यांच्या मदतीने करण्यात आले . मुख्याध्यापकांच्या हस्ते रोपट्याचे पूजन करून तसेच ग्रंथदिंडी काढून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी भजने म्हणून दाखवली तसेच घोषवाक्य म्हणत विद्यार्थी पालखी सोहळ्यामध्ये हातात जागृतीचे बोर्ड घेऊन ढोल ताशावर पाऊले टाकीत प्रभात फेरीत नृत्य करण्यात दंग झाली होती.
या प्रभात फेरीत विठ्ठल रखुमाईची वेशभूषा खास आकर्षण ठरले तसेच संताच्या वेशभुषेने सर्वांचे ध्यान आकर्षून घेतले यावेळी पालक वर्ग ही प्रभात फेरीसाठी उपस्थित होतात फुगड्या घालून पालकांनीही प्रभात फेरीचा आनंद घेतला .