पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या वतीने दिनांक एक जुलै कृषी दिन म्हणून साजरा केला जातो तसेच स्टेट बँकेचा वर्धापन दिन आहे.
याच दिवशी असल्याने या कार्यक्रमाचे औचित्य साधून स्टेट बँकेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर व वर्धापन यानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास सर तसेच सुहास निघते संघटक महेश भोसले जिल्हा सदस्य पांडुरंग अल्ला पुरकर तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे मकरंद पदमवार यांनी शुभेच्छा दिल्या तसेच टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर डे निमित्तानेही येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना तसेच शहरातील प्रत्येक डॉक्टर व बालरोग तज्ञ शितल शहा डॉक्टर साखरे व कृषी दिनानिमित्त पंचायत समिती मधील कृषी अधिकारी तसेच प्रेरणा बीज भांडार कासट या नाही असे दिनानिमित्त शुभेच्छा देऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही ग्राहकांसाठी कार्य करत असल्याची माहिती ही यावेळी येथील उपस्थितांना देण्यात आले डॉक्टर दिनानिमित्त पशुवैद्यकीय अधिकारी यांनाही पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन सर्व डॉक्टरांना शुभेच्छा महेश भोसले नंदकुमार देशपांडे कोल्हापूरकर यांनी येऊन ग्राहक पंचायती विषयी थोडक्यात माहिती विषय.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत वतीने ग्राहकांसाठी विविध उपक्रम प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केले जाते ग्राहक व दुकानदार यांच्यातील काही तक्रारी असेल तर सोडवण्याचे कार्यही अखिल भारतीय ग्राहक पंचायत करते याविषयी माहिती विशद करण्यात आली तसेच डॉक्टर निमित्त उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तसेच डॉक्टर राजेश पडे यांचाही डॉक्टर दिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.