विनोद पाटील अध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी कर्मचारी संघ पंढरपूर
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कर्मचारी श्री अनंता रोपळकर यांना आज दिनांक 3 जुलै 2024 रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे मंदिर समितीने नेमून दिलेले कर्तव्य पार पाडत असताना, शशीकांत पाटील, तालुका अध्यक्ष मनसे पंढरपूर या इसमाने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे.
या शशीकांत पाटील नामक इसमास श्री विठ्ठल रुक्मिणी माता चांगली सद्गबुध्दी देवो व घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी उद्या दिनांक 4 जुलै, 2024 रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचारी सकाळी 10 पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे नित्य उपचार वगळता इतर सर्व कामकाज बंद ठेवून आंदोलन करणार आहेत.
मंदिर समितीचे सर्व कर्मचारी या घडलेल्या घटनेमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात दुखावले आहेत. समितीचे कर्मचारी नेमून दिलेले कर्तव्य सेवाभावी वृर्तीने व जबाबदारीने पार पाडत आहे. तथापि, अशा घटनांमुळे प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे.
वरील सर्व बाबी विचारात घेता, संबंधित व्यक्तींना पांडुरंग चांगली सद्बुद्धी देवो व अशा गैरवर्तन करणाऱ्या इसमावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी व अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी उद्या सकाळी दहा पासून श्री चे नित्योपचार वगळता इतर कामकाज बंद ठेऊन आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री विनोद पाटील यांनी दिली.