पंढरपूर प्रतिनिधी तेज न्युज
रोटरी क्लबच्या नवीन वर्षाची सुरुवात ही १ जुलै पासून होते. नूतन वर्ष २०२४-२५ साठी पंढरपूर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी रो. सोमेश गानमोटे यांची तर सेक्रेटरीपदी रो.लक्ष्मीकांत कोटगीरी यांची निवड झाली असून रविवार दि.७ जुलै
रोजी सायं. ६.३० वाजता सिंहगड इन्स्टिट्यूट,कोर्टि, पंढरपूर येथे पदग्रहण समारंभ पार पडला असल्याची माहिती या वर्षी चे क्लब ट्रेनर रो. प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर यांनी दिली. कार्यक्रमासाठी येथील रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ चे माजी प्रांतपाल रो. डॉ. राजीव प्रधान व सहा. प्रांतपाल रो. एड.विशाल बेले
उपस्थित होते पंढरपूर रोटरी क्लबच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच झाली असून सर्वच नवीन पदाधिकाऱ्यांनी १ जुलै पासून आपला पदभार घेतला आहे.
सन १९३७ साली स्थापन झालेल्या पंढरपूर रोटरी क्लबचा ८७ वे अध्यक्ष म्हणून पदभार घेताना अतिशय आनंद होत आहे, अतिशय चांगली परंपरा असलेल्या पंढरपूर रोटरी क्लबला प्रत्येक अध्यक्षांनी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे, त्याचप्रमाणे सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन अध्यक्ष पदाचा कार्यभार पार पडणार असून सामाजिक क्षेत्रात रोटरी क्लबचा नावलौकीक वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन अध्यक्ष रो. सोमेश गानमोटे यांनी मत व्यक्त केले.
प्रत्येक व्यक्तीकडे एक वेगळी प्रतिभा असते. रोटरी आपल्या या प्रतिभेला चालना देण्यास उत्सुक असल्याचे नूतन सचिव रो. लक्ष्मीकांत कोडगीरी यांनी मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास रोटरीवर प्रेम करणारे रोटरीयन्स व मित्रपरिवार उपस्थित राहिल्याबद्दल रो.सोमेश गानमोटे यांनी आभार व्यक्त केले.