सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
केगाव येथील एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सेंटर फॉर रिसर्च अँड टेक्नॉंलॉजी डेव्हलपमेंट व जनरल सायन्स अँड इंजिनीअरिंग डिपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४जुलै ते २६ जुलै दरम्यान 'रेशीम उत्पादन व अत्याधुनिक तंत्रज्ञान' या विषयाशी निगडित २ऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचेआयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सिंहगड इन्स्टिट्यूट मधील सेंटर फॉर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट चे डायरेक्टर, व डी. वाय पाटील विद्यपीठाचे माजी कुलगुरू ज्येष्ठ संशोधक डॉ. शिवाजी.एच.पवार व सिंहगड अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी दिली. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या परिषदेच्या आयोजना संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना डॉ. एस. एच. पवार यांनी सांगितले की रेशीम कोळी व रेशीम किडे यापासून मिळणारे रेशीम म्हणजेच सिल्क हे पदार्थविज्ञान संशोधनासाठी महत्वाचा घटक असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. सिल्क हे प्रोटिन्स ने समृद्ध असल्यामुळे व त्याच्या असलेल्या विशिष्ठ जैवगुणधर्मामुळे ते इतर पॉलिमर्स पेक्षा सरस ठरते.
याच विषयावर फेब्रुवारी मध्ये १ल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.या परिषदेला देशविदेशातील शास्त्रज्ञ, संशोधक व विद्यार्थी उपस्थित होते. या परिषदेच्या यशस्वी आयोजनामुळे 'सिल्क सायन्स व टेक्नॉलॉजी' ला नवा आयाम मिळाला या परिषदेमध्ये चर्चा झालेले अभ्यासविषयांना अधिक गती मिळावी म्हणून २ऱ्या आंतरराष्ट्रीय 'सिल्क फाईब्रॉईन' या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे असेही डॉ. पवार यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी सिंहगड इन्स्टिट्यूट चे सहसचिव तथा कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय नवले व माजी संशोधक व माजी कुलगुरू डॉ. एस. एच. पवार डॉ. शंकर नवले,डॉ. एस. एस. शिरगण, डॉ. विनोद खरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रमाचे नियोजन आखण्यात येत आहे.
या पत्रकार परिषदेला प्राचार्य डॉ. शंकर नवले,डॉ. एस. एस. शिरगण,जनरल सायन्स विभागाचे विभागप्रमुख डॉ. विनोद खरात उपस्थित होते.