पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्षातून द्वितीय वर्षांत पदार्पण केलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी ओरिएंटेशन प्रोग्राम मध्ये दुसऱ्या वर्षाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागतील विद्यार्थ्यांना सर्वप्रथम एन इ पी करिकुलम याबद्दल विशेष माहिती दिली. त्यानंतर त्यांनी व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम, सर्टिफिकेशन कोर्सेस, इम्प्लांट ट्रेनिंग याचे महत्त्व समजावून सांगितले. याशिवाय मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात कार्यरत असलेल्या मेसा बद्दल बोलताना त्यांनी विविध उपक्रमाबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली. विविध उपक्रमांचा उपयोग करून घेण्याचे आव्हान या दरम्यान विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी केले. त्याच पद्धतीने विभागात होत असलेल्या इंडस्ट्रियल व्हिजिट व ट्रेनिंग प्रोग्राम याबद्दल माहिती दिली. यावर्षी अमलात आलेल्या मिनी प्रोजेक्ट आणि प्रोडॉक्ट डेव्हलपमेंट या उपक्रमाबद्दल विशेष मार्गदर्शन त्यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. प्रमोद नवले, प्रा. सुबोध साळुंखे, प्रा. अभिषेक गोडसे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. अनिल जाधव यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.