सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
रेणुका महिला भजनी मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गोंदवलेकर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरूवात केली .
प्रथम मंडळाच्या अध्यक्षा नमिता थिटे, शोभाताई देशपांडे, वैशाली ताई वळसंगकर, शीला खमितकर, संध्या मळेकर, सविता देशपांडे, रोहिणी कुलकर्णी अनिता कुलकर्णी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन केले. वृक्षारोपण, जेष्ठ नागरिकांचा सत्कार, महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून, एक मिनिट स्पर्धा, मेमरी टेस्ट, जेष्ठ महिलांचे स्पर्धा, उखाणा स्पर्धा, घेण्यात आले. 5 भजनी मंडळाच्या मार्गदर्शक , भारुडकार वैशाली वळसंगकर. या दोघींचा अध्यक्ष नमिता थिटे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प, नॅपकीन बुके देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच स्पधेर्चा सर्व विजेत्यांना नमिता थिटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नमिता थिटे यांनी केले, सुत्र संचालन रोहिणी कुलकर्णी यांनी केले, आभार प्रदर्शन शीला खमितकर यांनी केले.
एक मिनिट स्पर्धा, जेष्ठ सदस्या. प्रथम क्रमांक वैशाली वळसंगकर. द्वितीय क्रमांक. शशीकला कटारे. एक मिनिट स्पर्धा कॉमन प्रथम क्रमांक सविता देशपांडे दुतीय विभागून रोहिणी कुलकर्णी शीला खमितकर तृतीय विभागून प्रचिती मनगोळी अर्चना कुलकर्णी, मेमरी टेस्ट प्रथम क्रमांक वैशाली वळसंगकर द्वितीय क्रमांक संध्या मळेकर, उखाणा स्पर्धा प्रथम क्रमांक रोहिणी कुलकर्णी द्वितीय अनिता कुलकर्णी तृतीय सविता देशपांडे.
यावेळी सर्वांनी रेणुका महिला भजनी मंडळाच्या अध्यक्ष नमिता थिटे यांनी सुंदर कार्यक्रम घेतल्याबद्दल कौतुक करून अभिनंदन केले.