आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या प्रेरणेतून अनोखा उपक्रम
सातारा प्रतिनिधी तेज न्यूज
पाडळी (केसे) तालुका कराड जिल्हा सातारा येथील भाऊ वसंत चंदनशिवे यांनी आपल्या विवाहित मुलीची वृक्षारोपण कार्यक्रम करून सासरी पाठवणी केली.भाऊ यांच्या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा असून या उपक्रमाबद्दल त्याचे कौतुक करून इतरांनी अशा उपक्रमाचे अनुकरण करावे अशी जोरदार चर्चा सूरू आहे.
पाडळी (केसे) तालुका कराड, जिल्हा सातारा येथील भाऊ वसंत चंदनशिवे आणि सौ.मंगल भाऊ चंदनशिवे यांची कन्या चि.सौ. का.आर्ती चा विवाह नुकताच पंढरपूर तालुक्यातील विशाल इंगळे यांच्याशी झाला. जुन्या चाली रीती प्रमाणे विवाहानंतर मुलीची पाठवणी करताना एक आगळावेगळा उपक्रम भाऊ चंदनशिवे यांनी राबवला. पाडळी (केसे) तालुका कराड येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते आणि प्रवीण सावंत यांच्या एक व्यक्ती एक झाड या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन भाऊ चंदनशिवे यांनी आपली कन्या आर्ती हिची सासरी पाठवणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करून आणि वृक्षारोपण करून केली.
चि.सौ.का.आर्ती हिजी पाठवणी करताना आयोजित केलेल्या कार्यक्रमात आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, भीम आर्मी सामाजिक संघटनेचे प्रवीण सावंत, भाऊ वसंत चंदनशिवे, सौ. मंगल भाऊ चंदनशिवे, नासिर पटेल,चंद्रकांत चंदनशिवे, अभिमान चंदनशिवे, किरण शिरसाट, मोसीम मुल्ला सह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.