सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
रोटरी क्लब सोलापूरचे अध्यक्ष डॉक्टर ज्योतीताई चिडगुपकर यांच्या हस्ते करंजकर विद्यालय सोलापूर या शाळेला एक हजार लिटरची पाण्याची टाकी भेट देण्यात आली. डॉक्टर व्यंकटेश नूले यांच्या स्मरणार्थ प्रशांत नुले यांनी आजपर्यंत 68 वी टाकी भेट दिली आहे. शाळेतील मुलांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने प्रशांत नुले यांनी शाळेला ही भेट दिली आहे.
यावेळी रोटरी क्लबच्या माजी सचिवा विद्या मणुरे व माजी अध्यक्षा शांता येळमकर,माजी अध्यक्ष लायन सोमशेखर भोगडे,संस्थेचे सदस्य यांची उपस्थिती होती.
यावेळी मुख्याध्यापिका राजश्री तडकासे यांनी या बहुमोल मदती बद्दल रोटरी क्लब व नुले परिवाराचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीदेवी यळमेली यांनी केले तर आभार श्री. संतोष साठे यांनी मांडले.