सातारा प्रतिनिधी तेज न्यूज
पाचगणी जि.सातारा येथे झालेल्या कलरीपयट्टू च्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कु. सिद्धी मंगेश पांढरे हिने गोल्ड मेडल मिळवत घवघवीत यश संपादन केले.
तिला मार्गदर्शक शिक्षक दशरथ काळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तिची झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस आशीर्वाद. सर्व स्तरातून सिद्धी हिचे कौतुक होत आहे.