भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील योगीराज गजानन कवडे या विद्यार्थ्यानी नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
डॉ् चंद्रभानु सोनवणे ज्युनिअर कॉलेज उक्कडगाव येथून NEET 2024 मध्ये पहिल्याच प्रयत्नात 720 पैकी 632 गुण मिळाले असून या महाविद्यालयात 4 था क्रमांक आला.
त्या निमित्ताने कॉलेज ने सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजीव सोनवणे व कॉलेजचे प्राचार्य अंकुश पांचाल आणि विशाल गरड सर (शिव व्याख्याते)यांच्या उपस्थितीत पुष्गुच्छ आणि मेडल देऊन सत्कार करण्यात आला.
योगीराजच्या या यशाबद्दल देवांग कोष्टी समाज व समस्त ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.