खडकी प्रतिनिधी तेज न्यूज
पावसाळ्यात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी अनेक वेळा चक्क पावसात उभे राहून आपले कर्तव्य पार पाडतात. पावसामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर मोठा परिणाम होत असतो. सामाजिक बांधिलकीतून पस्तीस सदोतीस ग्रुपच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांना पावसाळी रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी बावधन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय भांडवलकर सहित अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग असतो. कायदा आणि सुव्यवस्था हे लोकशाहीचे दुसरा स्तंभ आहे. आपले कर्तव्य करताना पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध वातावरणाचा परिणाम होत असतो.
सध्या पावसाळा सुरू आहे, पावसाळ्यामुळे पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीवर परिणाम होतो. आपले कर्तव्य पार पाडताना अनेक वेळा पावसामध्ये देखील पोलीस कर्मचारी उभे राहतात. पोलीस कर्मचारी मनुष्य प्राणी असून सामाजिक बांधिलकीतुन पस्तीस सदोतीस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांच्या वतीने शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना पावसाळी सूटचे वाटप करण्यात आले. यावेळी अमित सणस, संदीप झोटे, अनिल बुरूंगले, भगत मोहिते, चिराग पोटे, यशवंत झोरे तसेच वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.