मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
साकीनाका येथे नीट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्र सुरू करून एक महिन्यात बंद करून फरार झालेल्या मालकाला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आदित्य देशमुखचा अखेर शोध लागला आहे. त्याचं खरं नाव औरगंडा अरविंद कुमार असून तो मूळचा हैदराबादचा राहणारा आहे. त्याला सध्या कर्नाटक पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
साकीनाका येथे नीट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आलं होतं. मात्र, अवघ्या एका महिन्यातच ते केंद्र बंद करुन क्लासच्या मालकानं पोबारा केला होता. अखेर त्या क्लास मालकाचा पोलिसांना शोध लागला आहे. त्याचं खरं नाव औरंगडा अरविंद कुमार आहे. तो मूळचा हैदराबादचा राहणारा आहे. त्याला सध्या कर्नाटक पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
बेळगावच्या मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अरविंद कुमारनं एक नीट प्रशिक्षण केंद्र सुरू केलं होतं. तिथे एमबीबीएसमध्ये अॅडमिशन देण्याच्या बहाण्यानं त्यानं अनेकांची फसवणूक केल्याची धक्कादायक गोष्टही समोर आली आहे. यामध्ये त्यानं एक कोटींपर्यंतची रक्कम लुटली होती. या प्रकरणात दाखल गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची फसवणूक करणारा हा सराईत गुन्हेगार असून या अगोदर त्याच्यावर हैदराबादेत 15 तर, बंगळुरूमध्ये एक गुन्हा दाखल आहे. मुंबईत देखील तो अशा प्रकारे विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक करण्याच्या तयारीत होता, अशी माहिती मिळत आहे.