पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा अजितदादा पवार यांचा सत्कार पुणे येथील जिजाई निवास्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सुनेत्रा पवार यांना जिल्हयातील पक्षवाढीच्या अडी-अडचणीबाबत सखोल चर्चा करुन त्यांना पंढरपूरच्या श्रीविठठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येण्याचे निमंत्रणही काळे यांनी दिले.