पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी (तालुका पंढरपूर) येथील मुसलमान येडगे वस्ती ते जुम्मा शेख वस्ती ,येडगे मुसलमान वस्ती ते लायकाल्ली शेख वस्ती या ठिकाणच्या दोन रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या रस्त्या मुळे या ठिकाणी जवळपास 400 ते 500 लोकांची वस्ती आहे.
त्यांची गेली कित्येक वर्षाचे होणारी गैरसोय हा रस्ता झाल्यामुळे थांबणार आहे म्हणून या रस्त्यासाठी जिल्हा नियोजन फंडातून महेश नाना साठे डीपीडीसी सदस्य तथा लोकसभा संपर्कप्रमुख शिवसेना यांनी या दोन्ही रस्त्यासाठी प्रत्येकी दहा दहा लाख रुपये त्यांच्या निधीतून दिले विशेष म्हणजे गेली दोन वर्षांमध्ये महेश साठे यांनी टाकळी कोर्टी गादेगाव भवाळी उंबरगाव सोनके तपकिरी शेटफळ या गावांना विकास निधी देण्याची भूमिका अग्रक्रमाने घेतल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या गावातील नागरिकाकडून महेश नाना साठे याच्या माध्यमातुन आशेचा किरण दिसत आहे यावेळी भूमिपूजन हे महेश नाना साठे यांच्या हस्ते झाले.
या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित कोर्टी गावचे सरपंच राजाभाऊ पवार माजी उपसरपंच तथा सदस्य महेश येडगे ग्रामपंचायत सदस्य बबलू शेख शरीफ भाई शेख इस्माईल शेख असलम शेख विजय काळे हरून मुजावर अनवर मुजावर सोहेल मुजावर महमूद शेख राजाभाई शेख व इतर कोरडे गावातील ग्रामस्थ मान्यवर हरून उपस्थित होते.