सार्थक चोरमले याने जिद्द आणि कष्टातून सीईटी परीक्षेमध्ये यश मिळवले. अमरसिंह माने देशमुख
माळशिरस तालुका प्रतिनिधी जयराम घाडगे
सार्थक चोरमले यांनी जिद्द चिकाटीआणि कष्टातून सीईटी परीक्षेत चांगले यश मिळवले असल्याचे प्रतिपादन वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख यांनी केले ते वेळापूर सोसायटी कार्यालयात सार्थक चोरमले याने सीईटी परीक्षेत सुयश मिळवल्याबद्दल त्याचा चेअरमन अमरसिंह माने देशमुख व सावता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष व सोसायटीचे व्हाईस चेअरमन महादेवभाऊ ताटे यांच्या हस्ते हार घालून, फेटा बांधून, पेढा भरून त्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
उघडेवाडी हद्दीत राहणारा व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संस्थेचा विद्यार्थी शेतकरी कुटूंबातील मुलगा सार्थक भीमराव चोरमले याने इयत्ता बारावी परीक्षेनंतर घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेमध्ये १०० पैकी ९९.१८ टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. तसेच त्याने १२ विज्ञान परिक्षेमध्ये ८९.८८ टक्के गुण मिळवले आहेत.
यावेळी बोलताना वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख म्हणाले की सार्थक चोरमले याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याने चिकाटीने जिद्दीने यश संपादन केले आहे. सार्थक चोरमले यांनी ज्याप्रमाणे शेतकरी कुटुंबातील असतानाही शिक्षणाची जिद्द सोडली नाही घरच्या गरीब परिस्थितीशी सामना करत बारावी विज्ञान परीक्षा व सीईटी परीक्षेमध्ये यश संपादन करून आपल्या कुटुंबाचे गावाचे शाळेचे नाव उज्वल केले आहे असे सांगुन त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला सोसायटीचे संचालक भीमराव मेटकरी, विश्वजीत माने देशमुख, हरी क्षिरसागर, मनोज मेटकरी, भाऊसाहेब चोरमले, जितेंद्र खंडागळे, संजय करमाळकर, बबन मंडले, सोनू साखरे आदी. उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार महादेव भाऊ ताटे यांनी मानले.