भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेत करोडो रुपयांचा घोटाळा झाला असून त्या खातेदारांच्या खात्यातून रक्कम गेले आहे त्या खातेदाराच्या खात्यात युनियन बँकेने तात्काळ जमा करावी याकरिता सर्व खातेदारांच्या वतीने भाळवणी येथील ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच रणजित जाधव यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
यावेळी उपसरपंच नितीन शिंदे, प्रवीण शिंदे,विजय शिंदे, शकील काझी, संजय बाबर,डॉ.आकाश चौगुले,आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सरपंच रणजीत जाधव म्हणाले की, फसवणूक झालेल्या खातेदारांना त्यांचे रक्कम तात्काळ खात्यात जमा करावी. दोषी व्यक्तीवर तात्काळ योग्य ती कारवाई करावी बँकेच्या वतीने खातेदारांना विश्वास द्यावा.
यावेळी बँकेचे प्रभारी अधिकारी विकास कश्यप म्हणाले कोणत्याही ग्राहकांनी आपल्या पैशाची काळजी करू नये. बँक राष्ट्रीयकृत असल्यामुळे सर्व ग्राहकाचे पैसे व्याजासह लवकरच त्यांच्या खात्यात जमा केले जातील. कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता खातेदारांनी आपल्या खाते पुस्तकासह बँकेत संपर्क साधावा असेही आव्हान कशप यांनी केले.