भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील वसंतराव काळे विद्यामंदिर चंद्रभागानगर येथे शनिवार दिनांक 15 जून 2024. रोजी शैक्षणिक वर्ष 2024-25 नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन व खाऊ वाटप करून प्रशालेचे मुख्याध्यापक एस. एल. काळे व उमेश चव्हाण, पवार, यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी छोटा गट मोठा गट ते पहिली व सातवी, सातवी पर्यंत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे व सोबत आलेल्या पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले तसेच शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप ही करण्यात आले.
सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व सर्व विद्यार्थ्यां उपस्थित होते.