दोन होतकरू हुशार विद्यार्थ्यांनीना शैक्षणिक दत्तक घेत एकलव्य अभ्यासिकेला अर्थिक मदत
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
करकंब गावची हुशार लेक होती.सर्वांची लाडकी होती.तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने न्यू इंग्लिश स्कूल करकंब शाळेच्या परिसरात पळसाच झाड लावलं आणि काही दिवसांत ती आपल्या सर्वांना सोडून देवाघरी गेली.पण तिच्या नावाने लावलेल ते पळसाच झाड तिची सदैव आठवण करून देत स्मृती जागवत ठेवत असताना तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्या लावलेल्या झाडाचं पूजन सलोनीचे आईवडील मोहनसिंग रजपूत स्मिता रजपूत संस्थेचे अध्यक्ष संजीवकुमार म्हेत्रे सचिव अविनाश देवकते मुख्याध्यापिका संगीता बुगड-करमाळकर मॅडम एकलव्य अभ्यासिकेचे नुतन अध्यक्ष प्रमोद रेडे पाटील उपाध्यक्ष व लेकीच्या झाड टीमचे संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे, देविदास काटवटे, शंकर गायकवाड, लऊळकर ,वेळापूरकर , पर्यवेक्षिका शिंदे ,माळी , चव्हाण ,योगेश गायकवाड,भिसे ,झमकडे ,शिक्षक स्टाफ या मान्यवरांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी सलोनीच्या स्मृतिप्रीत्यर्थ एकलव्य अभ्यासिकेला ७००१/-रुपयांचा चेक आई वडीलांच्या शुभहस्ते प्रमोद रेडे पाटील यांचेकडे सपूर्त करण्यात आला.त्या निधीतून एकलव्य अभ्यासिकेचा होणारा मासिक खर्चास मोठी मदत मिळाली असून एकलव्य अभ्यासिकेला मोठी प्रेरणा मिळाली आहे. सर्व अभ्यासू विद्यार्थी विद्यार्थिनीनी अभ्यासिकेला भेट देऊनअभ्यास करण्यासाठी लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले.यावेळी ज्ञानेश्वर दुधाणे, यांनी सांगितले की जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर क्षेत्र कुठलेही असो खडतर प्रयत्नाशिवाय पर्याय नाही,सर्वांनी ध्येय निश्चित करुन अभ्यास करा, झाडांसाठी पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करा,आपला परिसर स्वच्छ ठेवा,आई वडीलांची आज्ञा पाळा, जीवनात यशस्वी होणार असे सांगून संजीवकुमार म्हेत्रे ,संगीता बुगड मॅ,साहील रजपूत यांची मार्गदर्शक मनोगत संपन्न झाली.साहील रजपूत याला चांगल्या कंपनीत नोकरी लागल्या मुळे शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी रजपूत परिवाराच्या वतीने सर्व मुलांना खाऊ वाटप करत कार्यक्रम संपन्न झाला.