मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
कोकण दिप वृत समूह मागील २१ वर्षापासून सामाजिक आणि विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन विविध पुरस्कार प्रदान करून गौरव करीत असते.
यंदाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्ताने शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च असा राज्यस्तरीय मुंबई रत्न पुरस्कार - २०२४ हा पुरस्कार रविवार दि. १६ जून २०२४ रोजी दादर येथील मराठी ग्रंथ संग्रहालयातील सुरेंद्र गावस्कर या सभागृहात उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत संदीप परब महापौर पुरस्कार विजेते यांना प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.
याबद्दल कोकण दिप वृत्त समुहाचे संस्थापक संपादक दिलीप जी शेडगे यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. यावेळी दै. प्रहार चे ज्येष्ठ संपादक डॉ. सुकृतजी खांडेकर, मराठी अभिनेत्री साक्षी नाईक, अभिनेते श्री. निलेश बहरे, इतिहास लेखक श्री. प्रभू अग्रहारकर, दापोली शिवसेना संपर्क प्रमुख श्री. सुधीरजी कदम, उद्योजक श्री. दीपेंद्र पारदुले आदी मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.