भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
भाळवणी येथील मोदी समर्थक युवकांनी भारत देशाच्या पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी शपथ ग्रहण केल्यानंतर मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला.
येथील तरुण वर्गामध्ये दिल्लीमध्ये होत असलेल्या एन. डी. ए. सरकारच्या शपथ विधी सोहळ्याची आतुरता लागलेली होती. त्यामुळे सायंकाळी सव्वा सात वाजता देशाच्या पंतप्रधान पदाची नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथविधी घेतल्यानंतर येतील 201 तोफांची सलामी देऊन भारतीय जनता पार्टी, पांडुरंग परिवार व महात्मा फुले युवक संघतेनेतील युवकांनी आनंद उत्सव साजरा केला. तसेच यावेळी फिर एक बार मोदी सरकार, जय श्रीराम या या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
यावेळी उपसरपंच नितीन शिंदे म्हणाले, आजचा एनडीए सरकारचा शपथविधी हा संपूर्ण भारतातच काय ? पण जगातील एक सुवर्णक्षण म्हणून ओळखला जातोय. आज तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. देशातील जनतेने पुन्हा एकदा एनडीए सरकारवर विश्वास व्यक्त केला. त्याबद्दल सर्व मतदारांचे भाळवणी येथील भारतीय जनता पार्टी, पांडुरंग परिवार तसेच महात्मा फुले युवक संघटनेतील युवक वर्गाकडून आभार मानतो. पुढच्या पाच वर्षांमध्ये नरेंद्र मोदी व त्यांचे सर्व मंत्रिमंडळ जनतेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहून भारत देशाला नक्कीच विकासाच्या उच्च शिखरावर नेतील असा आशावाद शिंदे व्यक्त केला.
भाजपा तालुका उपाध्यक्ष तथा उपसरपंच नितीन शिंदे, अमित गवळी, गणेश गवळी, किरण लिंगे, धनराज गवळी, कौस्तुभ लिंग, सचिन लिंगे, विक्रम लिंगे, संदीप शिंदे, वैभव लिंगे, रावसाहेब वाईकर, समाधान गवळी, विष्णुपंत शिंदे, सहदेव नवाडे आदी युवक उपस्थित होते.