पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास पासचे वाटप करण्यात आले.
शासनाच्या ध्येय धोरणानुसार रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये भाळवणी येथे एस.टी आगर शाळेच्या दारी या उपक्रमा अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्रामीण विद्यार्थ्यांनी त्रेमासिक 100% सवलतीचा मोफत पासचे वाटप विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस डी रोकडे व विभाग प्रमुख ग्रंथपाल उत्तम शिंदे , कलाशिक्षक तुकाराम खरात, क्रीडा शिक्षक गजानन जमदाडे एस टी पंढरपूर आगार वाहतूक नियंत्रक एस.व्ही अष्टेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ७५ मुलींना मोफत पासचे वाटप झाल्या नंतर मुलींनी एसटी आगाराचे धन्यवाद मानले.