पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पुणे येथील भाविक सौ. स्नेहलता हेमंत शिंदे यांनी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस ५९ ग्रॅम (गंठण १ व लॉकेट १) सोने वस्तू अर्पण केले आहेत. त्याची किंमत रू.377000/- इतकी आहे.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने सौ.शिंदे यांचा सत्कार मंदिर समितीचे विभाग प्रमुख श्री ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब उपस्थित होते.