पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
जळगाव लोकसभा जळगाव शहर विधानसभा मध्ये निवडणूक निरीक्षक म्हणून भाजपा तसेच पक्षश्रेष्ठींनी मा.आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर जबाबदारी दिली आहे जबाबदारी मिळताच तात्काळ जळगाव लोकसभा मधील विविध भागात भाजप पक्षाच्या पदाधिकारी तसेच स्थानिक कार्यकर्ते यांची भेट घेतल्या.
जळगाव लोकसभेच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमती स्मिताताई उदय वाघ यांच्या प्रचारार्थ जळगाव शहर विधानसभा मध्ये बैठकीचे आयोजीत करण्यात आली होती यावेळी मा.आमदार प्रशांत परिचारक यांनी मार्गदर्शन करून महायुतीचे उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
यावेळी जळगाव शहर विधानसभेचे आमदार राजू मामा भोळे, मा.मंगलाजी बारी, उज्वलाताई बेंडाळे, भैरवी वाघ, मा.सुनील खटके, मुकुंद मेटकर, मंडल अध्यक्ष राहुलजी घोरपडे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते.