सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त लायन्स क्लब इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटीच्या वतीने बसव मानद पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यंदाच्या वर्षी एकूण निवड समितीने बारा व्यक्तीचे निवड करण्यात आली.
सुरूवातीस दिपप्रज्वलन आणि बसवेश्वर प्रतिमेचे पूजन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. सर्व मान्यवरांचे परीचय, स्वागत.लायन मोहन भुमकर यांनी केले.पुरस्काराचे मानकरी श्री गुरुशांत ढंगे बसव भक्त, श्री विद्यादर शाबादी बसव भक्त,श्री मल्लीनाथ कटप बसव रत्न, श्री श्रीमंत माळगे बसव भुषण, श्री मल्लीकाजुऺन मळसिध्दनवरू बसव भुषण, श्री कॄष्णा रायचुरकर बसव भुषण श्री सदानंद हब्बु बसव भक्त, श्री मुगेंद्र अप्पा चडचणकर बसव रत्न, श्री सिध्देश्वर किणगी बसव रत्न,सौ श्रीदेवी यळमेली बसव शरणी, सौ व श्री भिमाशंकर करजगीकर बसव शरण दांपत्य, सौ व श्री चनबसु माळगे बसव शरण दांपत्य,यांना यावेळी सिध्दाराम म्हेत्रे माजी गॄहमंत्री, राजशेखर शिवदारे स्वामी समर्थ सहकारी सूत गिरणी चेअरमन, प्रकाश हत्ती उद्योजक, नरेंद्र गंभीरे उपाध्यक्ष सिध्देश्वर सहकारी बॅक, ईरप्पा साल्लकी उद्योजक, लायन मोहन भुमकर अध्यक्ष यांच्या शुभहस्ते, सिध्दाराम म्हेत्रे माजी गृहमंत्री अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
यावेळी राजशेखर शिवदारे यांनी बसवेश्वर महाराज यांचे आचार विचार कथन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी सिध्दाराम म्हेत्रे यांनी अध्यक्षीय भाषणात बसवेश्वराचे विचार कथन करून आज तागायत बसव जयंती कुठल्याही क्लबने राबविले नाही तर लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटीने राबविले असे गौरवउद्गार काढले.
पुरस्कर्ते आणि लायन मोहन भूमकर अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. पुरस्कार स्वरूप स्मृती चिन्ह, शाल, बुके असे होते. यावेळी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. आभार प्रदर्शन लायन मोहन भुमकर यांनी केले.