गादेगाव प्रतिनिधी तेज न्यूज
31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन गेले बारा वर्षापासून गादेगाव येथे साजरा केला जातो गादेगावातील युवक व नागरिक यांनी व्यसनापासून प्रारूप व्हावं यासाठी दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो यावेळी तंबाखू व इतर शरीरास अपायकारक असणारे पदार्थ मावा गोवा अशा पदार्थांची या ठिकाणी दरवर्षी होळी केवळ करून जनजागृती निर्माण करण्याचं काम केलं जातं आज गादेगाव येथील चौकामध्ये या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू व तंबाखू मिश्रित पदार्थांची होळी करण्यात आली यामध्ये गादेगावातील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. जे लोक तंबाखूचे सेवन करत होते त्यांनी इथून पुढील काळामध्ये तंबाखूचे सेवन न करण्याचा संकल्प केला तंबाखू सेवनामुळे होणारे आजार याविषयी अनिल बागल यांनी आपले मत व्यक्त केले तंबाखू पासून महाभयानक कॅन्सर होऊ शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन मनसेचे अनिल बागल ,ग्रामपंचायत सदस्य गणपत मोरे ,मा.उपसरपंच भजनदास पवार ,वाल्मीक कोळी ,भाजपचे गणेश बागल यांच्या वतीने करण्यात येते आज या कार्यक्रमासाठी सरपंच बालाजी बागल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी बागल ,संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेब बागल ,विजय बागल, हनुमंत बागल, निपुल कोळी ,अतुल फाटे, भगवान महाराज, संजय बागल, संजय कदम ,बळीराम गिड्डे, अतुल बागल, सोमनाथ धोत्रे ,ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब बागल ,राजेंद्र मस्के, उत्तम बागल व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी एकच ध्यास व्यसनमुक्त गादेगाव ही संकल्पना पुढे घेऊन जाण्याचे सर्वानुमते ठरले यावेळी गणपत मोरे यांनी आभार मानले