भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दहावी ,बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच नितीन शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक भीमराव जाधव हे उपस्थित होते.
यावेळी प्रगती शेंडे, प्रीती माळवदे, शांभवी निराळी, प्रणाली झांबरे या विद्यार्थ्यांचा श्रीफळ, शाल, हार, पेढे देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भीमराव जाधव म्हणाले, या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश निश्चितपणे कौतुकास्पद आहे. यापुढेही शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होत राहो आणि आपल्या आई वडिलांचे नाव कौतुकास पात्र राहावे असे वर्तन आपण केले पाहिजे असे जाधव म्हणाले. यावेळी नितीन शिंदे म्हणाले, अशा सत्कार सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होत राहते. या सत्कार सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात नावलौकिक होऊ शकतो.
या कार्यक्रमाचे प्रस्तावित डॉ. धन्यवाद गाजरे यांनी केले. तर आभार विजय इंगळे यांनी मानले.