नादब्रह्म ब्राह्मण महिला मंडळ यांच्या ११व्या वर्धापन दिनानिमित्त अभंगवाणी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
नादब्रह्म ब्राह्मण महिला मंडळाच्या ११व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभंगवाणी मध्ये ख्यातनाम गायक सौरभ काडगांवकर आणि ऋतुजा लाड यांच्या स्वरांनी पंढरपूरकर रसिक मंत्रमुग्ध झाले सुरुवातीला सीमाताई परिचारक विनया परिचारक,सौरभ काडगांवकर ऋतुजा लाड, संस्थापक अध्यक्षा वैशाली काशिद,अध्यक्षा शिल्पा जोशी, अमृता बडवे, माधूरी जोशी,सर्व सदस्या तसेच कलाकार ज्ञानेश्वर दुधाणे ऋषिकेश जगताप लिलाधर चक्रदेव यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून पंढरपूर मधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या श्रीकांत बडवे -महाजन, श्रीराम बडवे, गणेश लंके, धनश्री उत्पात, रेश्मा गुजर,गीता थोरात,या व्यक्तींना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.व्यक्तींना सन्मानित करण्यात आले त्यानंतर गायनाला सुरुवात झाली.
सुरुवातीला वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र जय जय राम कृष्ण हरी ने सुरुवात करत वातावरण भक्तिमय होऊन संतांच्या रचनांची अवीट गोडी त्यामध्ये रुप पाहता लोचनी, पालखीचे भोई,आधी रचिली पंढरी,माझे माहेर पंढरी,अवघे गर्जे पंढरपूर,करत देवा घरचे ज्ञात कुणाला, काटा रुते कुणाला,भय इथले संपत नाही,घन निळा लडिवाळा,अशा अनेक संतरचना आणि नाट्यगीत गाऊन पंढरपूर कला रसिक श्रोत्यांना अविस्मरणीय स्वरांची अनुभूती दिली.शेवटी बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल या संत रचनेने कार्यक्रमाची सांगता केली.त्यांना तितकीच अप्रतिम साथसंगत तबला ऋषिकेश जगताप हार्मोनियम लिलाधर चक्रदेव पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ शिवराज पंडीत यांनी केली.तबला पखवाज यांच्या साथीने अधिक रंगत आणली.पंढरपूर कलारसिक श्रोत्यांची उपस्थिती अधिक प्रेरणा देणारी ठरली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्योती कुलकर्णी यांनी केले तर आभार वंदना भणगे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मानसी कर्वे, गीता बडवे, रेणुका चाकोरकर,प्रिया बडवे,देवकी बडवे,अनिता शहापूरे,स्नेहा बडवे,अमृता बडवे, सीमा विनायक,आदी सदस्यांनी अधिक परिश्रम घेतले.