ज्ञानेश्वर दुधाणे यांचे पखवाज वादन ऋषिकेश सुरवसे यांचे तबलावादन आणि सिध्देय पुरवत यांच्या सतारवादनाने रसिक तृप्त
करकंब प्रतिनिधी
श्रीराम नवमी निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे श्रीराम प्रतिष्ठान व नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित श्रीराम संगीत महोत्सवाचे आयोजन आले असताना आजच्या दुसऱ्या दिवसाच्या महोत्सवाचे पुष्प करकंब मधील कलाकारांनी गुंफले,सुरुवातीला संस्थापक मिलिंद उकरंडे सिध्देय पुरवत, ऋषिकेश सुरवसे, सचिव विजय भागवत आणि सर्व सन्माननीय सदस्य डॉ सागर पुरवत डॉ प्रसाद कुलकर्णी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन संपन्न झाले.
सुरुवात उदयोन्मुख युवा तबलावादक ऋषिकेश सुरवसे यांच्या तबलावादनाने झाली.अतिशय सुंदर वादनकरुन रसिकांची मने जिंकली त्यांना लेहरासाथ श्रीरंग जाकी यांनी केली.त्यानंतर ज्ञानेश्वर दुधाणे यांच्या पखवाज वादनाला सुरुवात झाली.त्यामध्ये ताल आदिताल सादर केला . त्यामध्ये त्यांनी उठान,कायदे, चक्रदार,परण, सादर करत कला रसिकांना मंत्रमुग्ध केले.अतिशय धीरगंभीर असणारं पखवाज वाद्य ग्रामीण भागातील रसिकांनी अतिशय सुंदर प्रतिसाद देत पखवाज वादनाने मंत्रमुग्ध केले त्यांना तितकीच सुंदर लेहरासाथ -आण्णासाहेब सुरवसे यांनी दिली.त्यानंतर करकंब गावचेच सुपूत्र सिध्देय पुरवत यांच्या सतारवादनाला सुरुवात झाली.त्यांना आलाप,जोड झाला सादर करत राग शामकल्याण सादर केला . त्यांनतर तीनतालातील द्रुत गत वाजवत बजाओ ढोल स्वागत मे मेरे भगवान आये है या सुंदर गीताने सतार वादनाची सांगता केली.त्यांना अप्रतिम साथसंगत तबला ऋषिकेश सुरवसे पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केली.घरात कसलीही संगीताची परंपरा नसताना सिध्देय पुरवत यांनी सतारवादनाचे क्षेत्र निवडलं असून त्यांना गुरू ही उस्ताद शाकीर खान यांचे मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू असून ही बाब करकंब करांसाठी अभिमानास्पद आहे.दोनदिवशीय संगीत महोत्सवाला करकंब कलारसिक श्रोत्यांनी उदंड प्रतिसाद देत आनंद घेतला.
दोन दिवसांचा हा संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठान चे आणि नादब्रह्म कला फाउंडेशन च्या सर्व सदस्यांनी आणि विजय भागवत,देवकी दुधाणे,विशाल बोधे , देविदास काटवटे,बापू खारे,मोहन बोधे,अधिक परिश्रम घेतले.असाच प्रतिसाद भविष्यकाळातील उपक्रमांना द्यावा असे आवाहन श्रीराम प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले.