फुलचिंचोली प्रतिनिधी तेज न्यूज
शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती फुलचिंचोली येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मार्केट कमिटीचे संचालक नागनाथ मोहिते, मा.सरपंच मारुती वाघ, डॉ.लक्ष्मण किलमीसे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नागेश जाधव, महात्मा फुले समता परिषद तालुका अध्यक्ष चंद्रशेखर जाधव, शंकर बनसोडे, बबलू बनसोडे, दत्ता जाधव, निलेश मोहिते, नामदेव काळे आदीसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महात्मा फुले समता परिषद व महात्मा फुले युवक व क्रीडा मंडळ फुलचिंचोली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ही करण्यात आले होते.
यावेळी सुमारे ५१ जणांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला. हे रक्तदान शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी मेडिकेअर ब्लड बँक सोलापूर व मेडिकेअर ब्लड बँकेचे चेअरमन सुशांत शेलरा व त्यांच्या सर्व स्टाफने सहकार्य केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.