सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन समर्पित करणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर वकील संघात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमे स पुष्पहार अर्पण करून वैचारिक प्रणालीस उजाळा दिला.
यावेळी वकिल संघाचे अध्यक्ष ॲड सुरेश गायकवाड, सहसचिव अनिता रणशृंगारे सचिव करण भोसले अजय रणशृंगारे ॲड रविराज सरवदे.ॲड.सुनिल प्रकाले आदी उपस्थित होते.