भाळवणी प्रतिनिधी
धोंडेवाडी ता. पंढरपूर येथील विकासवाडी अंगणवाडी येथे ग्रामपंचायत धोंडेवाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचे सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत महिला व बालविकास विभागाचे वतीने पं.स. पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली शासकीय निधीतून बांधण्यात आलेल्या नुतन अंगणवाडी इमारतींमध्ये सर्व बालचमुचा प्रवेश अतिशय आनंददायी वातारणात ग्रामपंचायत सदस्या मोहिनी लोखंडे यांचे शुभ हस्ते फित कापून करण्यात आला.
यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सांगले म्हणाले,लहान लहान बालकांच्या निरागस चेहरयावर दिसणारे हास्य व समाधान कोणत्याही किंमतीत मोजता येणार नाही.
यावेळी आदर्श अंगणवाडी सेविका कु.सुनिता देठे ताई मदतनीस मनिषा साळुंखे ग्रामपंचायत चे सर्व आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थीत होते.