सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर विधीज्ञ संघाच्या सदस्या शहर मध्य विधानसभेच्या विद्यमान आमदार मा.ॲड.प्रणितीताई शिंदे यांना महाविकास आघाडीचे माध्यमातून भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या वतीने लोकसभेची उमेदवारी मिळाली या करिता सोलापूर बार असोसिएशन च्या वतीने त्याचे अभिनंदन करून स्वागत करण्यात आले.या उमेदवारीच्या समर्थनार्थ वकिल संघाचे अध्यक्ष ॲड.सुरेश- बापू गायकवाड यांचे नेतृत्वाखाली सदिच्छा भेट घेतली.
. या वेळी विधीज्ञ संघाचे उपाध्यक्ष ॲड असिम बांगी, सचिव ॲड करण भोसले सहसचिवा ॲड अनिता रणशृंगारे,माजी अध्यक्षा मंगला जोशी -चिंचोळकर, माजी अध्यक्ष ॲड. के.चंद्रमोहन, ॲड.दादासाहेब जाधव , ॲड.युवराज आवताडे, ॲड .अजय रणशृंगारे, ॲड.पी.बी.गायकवाड , ॲड.रफिक शेख, ॲड.सुनिल क्षीरसागर, ॲड.कुरापटी , ॲड. सहदेव भडकुंबे , ॲड.केशव ईगंळे, ॲड.वसिम बागवान ॲड राहुल व्होटकर आदींची उपस्थिती होती.
ॲड.प्रणिती शिंदे हया एक अदर्श व कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी आहेत.शहराच्या अनेक विकासकामात त्यांचे मोठे योगदान आहे .सलग तीन टर्म विधानसभा सदस्य म्हणून उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या सोलापूर विधीज्ञ संघातील पहिल्या एकमेव महिला विधीज्ञा आहेत..याचा आम्हा सोलापूर वकिल बांधू व भगिनींना रास्त अभिमान आहे.आता त्यांना महाविकास आघाडीने लोकसभेची उमेदवारी दिली आहे.या माध्यमातून त्याना संसदेत सोलापूराचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.त्या उमेदवारी चे स्वागत करून त्यांच्या विजयासाठी मेहनत करण्याची ग्वाही यावेळी वकिलानी दिली.
यावेळी आ. प्रणिती शिंदे सह कॉग्रेस चे जेष्ठ नेते सुशिल कुमार शिंदे यांची देखील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि निवडणूक प्रचारातील वकिलाची भूमिका काय राहील यावर चर्चा केली.