श्रीराम प्रतिष्ठान आणि नादब्रह्म कला फाउंडेशन यांचा पुढाकार
श्रीराम प्रतिष्ठान गेली अकरा वर्षे जपत आहे करकंब गावच्या सांस्कृतिक वारसा
करकंब प्रतिनिधी
श्रीराम नवमी निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे श्रीराम प्रतिष्ठान करकंब व नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब यांचे संयुक्त विद्यमाने करकंब येथे गुरुवार-शुक्रवार दिनांक ११-१२ एप्रिल रात्री ७:०० ते १०:०० या वेळेत श्री चौंडेश्वरी मंदिर सोमवार पेठ येथे श्रीराम संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे सचिव विजय भागवत यांनी सांगितले.
करकंब गावची सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक परंपरा जपण्यासाठी गेली अकरा वर्षे अखंडपणे काम करीत असताना यावर्षी गुरुवार दिनांक ११ एप्रिल रोजी दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका आणि लोकमत जोस्ना दर्डा राष्ट्रीय पुरस्कार विजेती कु. ज्ञानेश्वरी गाडगे हिचा "स्वर ज्ञानेश्वरी" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यांना हार्मोनियम साथ कार्तिकी घाडगे गणेश गाडगे,तबला साथ विवेक पोतदार पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ शिवराज पंडीत करणार आहेत.तर शुक्रवार १२ एप्रिल रोजी करकंब गावच्या संगीत क्षेत्रातील सुपुत्रांचा म्हणजे "कलाउन्मेष" प्रथम सत्रात पखवाजवादक ज्ञानेश्वर दुधाणे यांचे पखवाजवादन आणि द्वितीय सत्रात उस्ताद शाकीर खान यांचे शिष्य सिध्देय पुरवत यांचे सतारवादन होणार आहे.त्यांना लेहरा साथ वैभव केंगार तर तबला साथ ऋषिकेश सुरवसे करणार आहेत या दोनदिवसीय संगीत महोत्सवाचे हे यशस्वी ११वे वर्ष असून ग्रामीण भागात कलेची आवड नवीन तरुण तरुणींमध्ये व्हावी . आणि नवीन पिढी सुसंस्कृत बनावी आणि सांगितिक वारसा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी यांचे आयोजन केल्याचे संस्थापक मिलिंद उकरंडे यांनी सांगितले.सदरहु कार्यक्रमाला करकंब व करकंब पंचक्रोशीतील सर्व कलारसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
सदरहू संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठान करकंब व नादब्रह्म कला फाउंडेशन चे सदस्य अधिक परिश्रम घेत आहेत.सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन ही करण्यात येत आहे.अधिक महिती साठी 9767776858 वर संपर्क साधावा