आव्हे प्रतिनिधी
आव्हे गावातील सामान्य कुटुंबात जन्माला येऊन शेतातील कष्ट करून वडील शिकलेले नसतानाही घरात शिक्षणाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना जिद्द चिकाटी कष्ट याच्या जोरावर केंद्रीय आयकर विभागाच्या आयकर विभागाच्या टॅक्स ऑफिसर पदी निवड झाल्याबद्दल तिचे आवे व पंचक्रोशीतून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
तिचे शिक्षण पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आव्हे व आठवी ते दहावी रत्न महर्षी मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय आवे व अकरावी बारावी नांदुरे येथील ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल नांदुरे येथे व पुढील शिक्षण 13 व 14 वी चे पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे शिक्षण पूर्ण केले.