श्रीराम प्रतिष्ठान व नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब नगरीचा सांस्कृतिक वारसा
सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी करकंबकर कला रसिकांचा श्रीराम संगीत महोत्सवाला उदंड प्रतिसाद
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
श्रीराम नवमी निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे श्रीराम प्रतिष्ठान व नादब्रह्म कला फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम संगीत महोत्सवाचा शुभारंभ उत्साही वातावरणात झाला.
सुरुवातीला श्रीरामरायाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन ज्ञानेश्वरी गाडगे, गणेश गाडगे,संस्थापक मिलिंद उकरंडे अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे सचिव विजय भागवत जेष्ठ सदस्य प्रभाकर टेके प्रभाकर रसाळ संजीवकुमार म्हेत्रे धनंजय इदाते संंतोष बुगड संतोष टकले, नवनाथ आलेकर,अशोक म्हेत्रे, दत्तात्रय इदाते, सुरेंद्र इदाते, राजेंद्र टकले,शितल भरते,मोहन बोधे , दयानंद आलेकर सर्व सदस्यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
त्यानंतर महाराष्ट्राची लाडकी गायिका आणि सुर ज्योत्स्ना राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका ज्ञानेश्वरी गाडगे हिच्या सुमधुर गायनाला सुरुवात झाली.सुरुवातीलाच अभिजात शास्त्रीय संगीतील जोग रागातील साजन मोरे घर आयो याने सुरुवात करत शास्त्रीय संगीताची मेजवानी देत नंतर बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, तिर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल,दिलं की तपिश, अबीर गुलाल उधळीत रंग,अवघे गर्जे पंढरपूर,कानडा राजा पंढरीचा,माझे माहेर पंढरी,भाग्यदा लक्ष्मी बारंम्मा,आदी अभंगांनी वातावरण भक्तिमय केले.त्यानंतर हिंदी मराठी चित्रपट दम दमा दम मस्त कलंदर, मला म्हणत्यात हो पुण्याची मैना,वाजले की बारा,लावणीने रसिकांना ठेका धरायला लावला,अशा विविध प्रकारच्या गाण्यांनी करकंबकर कला रसिकांना मंत्रमुग्ध करत भैरवी स्वामी कृपा कधी करणार याने रसिकांच्या हृदयावर अविस्मरणीय मैफिलचा अनुभव दिला.त्यांना तितकीच अप्रतिम दमदार साथसंगत गणेश गाडगे तबला विवेक पोतदार, हार्मोनियम कार्तिकी गाडगे, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे,ढोलक बापूराव भोसले एक्टोपॅड सिध्दार्थ दणाणे, यांनी सुंदर केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले तर आभार विजय भागवत यांनी मानले.अगदी १२ वर्षाच्या या ज्ञानेश्वरीचे गायन म्हणजे एक चमत्कार असून आपल्या मुलांनीही ज्ञानेश्वरीची प्रेरणा घेऊन आपलं आयुष्य यशस्वीपणे निर्माण कराव हा भाव प्रत्येक कलारसिकांच्या चेहऱ्यावर दिसत होता.करकंब,मोहोळ, तुळशी, मोडनिंब, पंढरपूर, पंचक्रोशीतील कलारसिकांनी उदंड प्रतिसाद देत उपस्थिती दर्शविली.महोत्सव यशस्वी होण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठान व नादब्रह्म कला फाउंडेशन चे सर्व सदस्य अधिक परिश्रम घेत आहेत.दुसरा दिवशी करकंब येथील कलाकारांचा कलाविष्कार संपन्न होणार असून ज्ञानेश्वर दुधाणे यांचे पखवाजवादन आणि सिध्देय पुरवत यांचे सतारवादन होणार आहे.