सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
भाजपनं माढा लोकसभा निवडणुकी करिता रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवार जाहीर केल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय उद्रेक झाला आहे. अकलुजच्या मोहिते-पाटील आणि फलटणच्या रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या कुटुंबानं रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोधात दर्शवला होता. पण, भाजपनं कोणताही निर्णय न घेतल्यानं अखेर धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता धैर्यशील मोहिते-पाटील 'तुतारी' हाती घेणार असून महायुतीच्या अडचणीत वाढ होणार आहे
भाजपनं विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या मोहित-पाटील कुटुंबीयांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह कायम ठेवला होता. भाजपवर दबावतंत्राचा वापर करून उमेदवार बदलण्याची मागणी मोहिते-पाटील आणि रामराजे-नाईक निंबाळकर यांचे कुटुंबीय करत होते. पण, भाजपनं तशी पावले उचलली नसल्यानं अखेर धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहित मोहिते-पाटलांनी राजीनामा दिला आहे.

पत्रात काय म्हटलं ?
मा.आ.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, प्रदेश अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य.
विषय: पद व सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारण्याबाबत..
महोदय, मी भारतीय जनता पार्टी, सोलापूर जिल्हा, संघटन सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच, माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी माझ्याकडे आहे. या कार्यकाळात जिल्हा, मंडल कार्यकारणी, मोर्चा, प्रकोष्ठ इत्यादी संघटनात्मक रचना गठीत करून कार्यान्वित करण्याचे कार्य केले. तसेच शक्तिकेंद्र, सुपर वॉरीयर, बूथ रचनाही पूर्ण करून सक्रीय केल्या. वेळोवेळी पक्षाचे विविध कार्यक्रम आयोजित करून संघटना व बूथच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे.
आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास व दिलेल्या संधीबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करतो, व आपणास कळवू इच्छितो की, मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव, भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा, तसेच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा देत आहे, त्याचा स्विकार व्हावा ही विनंती.