लक्ष्मीदहिवडी प्रतिनिधी तेज न्यूज
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले युवा मंच यांच्यावतीने लक्ष्मीदहिवडी येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
यामध्ये 52 हून अधिक जास्त लोकांनी रक्तदान केले असल्याची माहिती महात्मा फुले युवा मंचचे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सयाजी बनसोडे यांनी दिली.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महात्मा फुले युवा मंच च्या वतीने लक्ष्मी दहिवडी मध्ये आयोजित आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉक्टर पियुष साळुंखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. डॉक्टर गणेश गुरव,डॉक्टर विक्रम अडसूळ,डॉक्टर साहेबराव इमडे,डॉक्टर अमोल राजगे यांच्या उपस्थितीमध्ये रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले.क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यासाठी रेवनील ब्लड बँकेचे डॉ.सोमेश्वर यावलकर यांच्या टीमने शिबिर यशस्वी पार पाडले.
सांगोला रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना अल्पोहार व प्रमाणपत्र देण्यात आले.रक्तदान शिबिर महात्मा फुले युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पडल्याची माहिती देण्यात आली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले युवा मंचचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.