पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
यादरम्यान डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. संपत देशमुख, अविनाश वाघमारे, दत्तात्रय पवार, सारीका नवले, विकास इतापे आदींसह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.