पुणे प्रतिनिधी
पैलवानकीचा सराव करत असताना माझा कोल्हापूर आणि पुणे परिसरात पैलवानांचा मोठा मित्र परिवार तयार झाला. विविध तालमींमध्ये ओळखी झाल्या, पैलवान मित्र जोडले गेले, वस्तादांचं मार्गदर्शन मिळत राहिलं. आत्ता मी स्वतः लोकसभेच्या आखाड्यात उतरल्याने हेच माझ्या पैलवानकीच्या जीवनाचं ‘संचित’ आज माझ्यासाठी उभं राहात आहे, हे मनस्वी समाधान देणारं आहे. येत्या कालावधी ८ ते ९ हजार पैलवान स्वयंस्फूर्तीने प्रचारात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे माझा सर्व पैलवान परिवार माझ्या उमेदवारीच्या निमित्ताने एकत्र आला आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे.
पुढील प्रचारासाठीच्या नियोजनासंदर्भात आज झालेल्या बैठकीत पुढील ४५ दिवसांचे नियोजन करण्यात आले. कर्वे रस्त्यावरील अंबर हॅाल येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, विविध तालमींचे वस्ताद, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आवर्जून उपस्थित होते.
यावेळी पै. दीपकभाऊ मानकर, पै. बापूसाहेब पठारे, पै. विकास दांगट, पै. आप्पासाहेब रेणूसे, पै. शुक्राचार्य वांजळे, पै. बाबा कंधारे, पै. हनुमंत गावडे, पै. योगेश दोडके, पै. संदीपअप्पा भोंडवे, पै. विलास कथुरे सर, पै. ज्ञानेश्वर मांगडे, पै. विजय बनकर, पै. शिवराज राक्षे, पै. राजेश बारगुजे, पै. संतोष गरुड, पै. नितीन दांगट, पै. रामभाऊ सासवडे, पै. पंकज हरपुडे, पै. महेश मोहोळ, पै. राजू मोहोळ, पै. तात्या भिंताडे, पै. अभिजीत आंधळकर, पै. विजय जाधव, पै. अमोल बराटे, पै. शिवाजी तांगडे यांच्यासह पुणे आणि परिसरातील पैलवान मोठ्या संख्यने उपस्थित होते.